रत्नागिरी, दि. १४ : संगमेश्वर तालुक्यातील मौजे किरडुवे येथे आपला संकल्प विकसित भारत हा कार्यक्रम घेण्यात आला. या अंतर्गत महाराष्ट्र शासन-कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात आली.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, फळबाग लागवड, मागेल त्याला शेततळे या विषयावर मंडळ कृषी अधिकारी पी. बी.कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
सरपंच मुकेश कुमार बारगुडे, ग्रामसेवक संदिप शिंदे, पोलिस पाटील मदन शिंदे व कोंडरण पो.पा. ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी उपस्थित होते. यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कलावती कृष्णा पांचाळ, पावर विडर व पांडुरंग शिंदे ग्रास कटर लाभार्थी उपस्थित होते.
दापोली तालुक्यातील शिरसाडी, गुहागर तालुक्यातील शीर, मासु, कुडाळी, जांभारी येथेही हा कार्यक्रम करण्यात आला.