https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर धावणार तीन ख्रिसमस विशेष गाड्या!

0 100

रत्नागिरी : हिवाळी पर्यटन हंगाम तसेच ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विशेष गाड्या पुढीलप्रमाणे असतील :

1) गाडी क्रमांक 01151 / 01152 मुंबई सीएसएमटी – करमळी – मुंबई सीएसएमटी विशेष (दररोज):

गाडी क्रमांक 01151 मुंबई सीएसएमटी – करमळी विशेष (दररोज) मुंबई सीएसएमटी येथून 00.20 वाजता दररोज 20/12/2024 ते 05/01/2025 दरम्यान सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी 13.30 वाजता ती पोहोचेल.

गाडी क्रमांक 01152 करमळी – मुंबई सीएसएमटी विशेष (दररोज) करमळी येथून 14.15 वाजता दररोज 20/12/2024 ते 05/01/2025 दरम्यान सुटेल व मुंबई सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी 03.45 वाजता ती पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवीम.

डब्यांची रचना: एकूण 22 डबे = प्रथम वातानुकूलित – 01 डबा, मिश्रित (प्रथम वातानुकूलित + द्वितीय वातानुकूलित) – 01 डबा, द्वितीय वातानुकूलित – 03 डबे, तृतीय वातानुकूलित – 11 डबे, स्लीपर – 02 डबे, सामान्य – 02 डबे, एसएलआर – 02 डबे.

2) गाडी क्रमांक 01463 / 01464 लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक):

गाडी क्रमांक 01463 लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली विशेष (साप्ताहिक) लोकमान्य टिळक (टी) येथून 16:00 वाजता गुरुवारी 19/12/2024, 26/12/2024, 02/01/2025 आणि 09/01/2025 रोजी सुटेल आणि कोचुवेली येथे ती दुसऱ्या दिवशी 22:45 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01464 कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) कोचुवेली येथून 16.20 वाजता शनिवारी 21/12/2024, 28/12/2024, 04/01/2025 आणि 11/01/2025 रोजी सुटून लोकमान्य टिळक (टी) येथे तिसऱ्या दिवशी 00.45 वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकल, मूकांबिका रोड बायंदूर (एच), कुंडापूर, उडुपी, सुरतकल, मंगळूरु जंक्शन, कासरगोड, कन्नूर, कोळीकोड, तिरूर, शोरनूर जंक्शन, त्रिशूर, एर्नाकुलम टाऊन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मवेलिकरा, कयांकुलम आणि कोल्लम जंक्शन.

डब्यांची रचना: एकूण 22 एलएचबी डबे = द्वितीय वातानुकूलित – 02 डबे, तृतीय वातानुकूलित – 06 डबे, स्लीपर – 09 डबे, सामान्य – 03 डबे, जनरेटर कार – 01 डबा, एसएलआर – 01 डबा.

3) गाडी क्रमांक 01407 / 01408 पुणे जंक्शन – करमळी – पुणे जंक्शन विशेष (साप्ताहिक):

गाडी क्रमांक 01407 पुणे जंक्शन – करमळी विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून 05:10 वाजता बुधवार 25/12/2024, 01/01/2025 आणि 08/01/2025 रोजी सुटेल आणि गाडी करमळी येथे त्याच दिवशी 20:25 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01408 करमळी – पुणे जंक्शन विशेष (साप्ताहिक) करमळी येथून 22:00 वाजता बुधवार 25/12/2024, 01/01/2025 आणि 08/01/2025 रोजी सुटेल. गाडी पुणे जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 13:00 वाजता पोहोचेल.

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम.

डब्यांची रचना: एकूण 17 डबे = प्रथम वातानुकूलित – 01 डबा, द्वितीय वातानुकूलित – 01 डबा, तृतीय वातानुकूलित – 02 डबे, स्लीपर – 05 डबे, सामान्य – 06 डबे, एसएलआर – 02 डबे.

Leave A Reply

Your email address will not be published.