https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

तळवडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान!

0 57

लांजा : आज तळवडे राजापूर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात वन विभागाला यश आले. गुरुवारी दि. 01 जून 2023 रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

तळवडे वाकाडवाडी ता. राजापूर येथील सीताराम तुकाराम चव्हाण यांच्या मालकी गट नंबर. ३६९ मधील विहिरीमध्ये बिबट्या पडल्या असल्याचे तलाठी अजित पाटील यांनी वनपाल राजापूर सदानंद घाटगे यांना सांगितले. त्या नंतर वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांना भ्रमणध्वनीवरून वनपाल यांनी माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या रेस्कु टीम जागेवर जाऊन पाहणी केली असता भक्षाचा (मांजरा) चा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडलेला असुन विहिरीला कठडा नाही तसेच विहीर जवळपास तिस फुट खोल असुन घेरी पंधरा फूट आहे विहिरीचा काठ ठिसूळ असुन सतत माती व दगड पडत असते विहिरीत पाणी साधारण दहा फूट आहे.


विहिरीमध्ये मांजर एक व बिबट्या दिसुन आले. मांजर मृत होते त्यास प्रथम बाहेर काढून बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यासाठी पिंजरा विहिरीत दहा वाजता सोडण्यात आला. जवळपास दोन ते अडीच तासानंतर १२:२५ वाजता बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षित आला. हा बिबट्या हा साधारणत: सहा महिने वयाचा असुन ती मादी आहे. या वन्यप्राण्याची पशुसंवर्धन अधिकारी लांजा यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली तो सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. त्या नंतर मा विभागीय वनाधिकारी रत्नागिरी दीपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या स नैसर्गिक अधिवासात सोडून दिले व रेस्कु ऑपरेशन सुरक्षित पार पाडले.

या कामगिरीसाठी प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी , सदानंद घाडगे वनपाल राजापूर, विक्रम कुंभार वनरक्षक राजापूर, प्रभु साबने वनरक्षक रत्नागिरी, रेस्कु टीम राजापूर चे दिपक म्हादये, विजय म्हादये, गणेश गुरव, प्रथमेश म्हादये , निलेश म्हादये सरपंच तळवडे गायत्री साळवी, पोलिस पाटील शितल कोटकर, तंटामुक्त अध्यक्ष शिवराम कोटकर, धनश्री मोरे महिला दक्षता कमिटी पोलिस स्टेशन राजापूर, कमलाकर पाटील पोलिस हेड कॉन्स्टेबल, सुजित पाटील, नितीन भानवसे, तुषार पाचलकर पत्रकार , सुरेश गुडेकर पत्रकार व दया सुतार व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


या प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.