रत्नागिरी : मिरजोळे ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. ग्रा. पं. हद्दीतील कचरा उचलण्यासाठी ग्रा. पं. ने सुरु केलेल्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.
जिल्ह्याचे मुख्याल असलेल्या रत्नागिरीतील वाढत्या शहराीकरणामुळे अनेकजण मिरजोळे अनेक शहरालगतच्या नाचणे, मिरजोळे, शिरगाव तसेच कुवारबाव ग्रामपंचायत हद्दीतील इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात सदनिका खरेदी करीत आहेत. मिरजोळे ग्रामपंचायत औद्योगिक वसाहत देखील विस्तारलेली असल्याने अनेकजण या ग्रा.पं.च्या हद्दीतील सदनिकांमध्ये घरे खरेदी करीत आहेत. मात्र, शेजारच्या नाचणे तसेच शिरगाव ग्रा.पं. प्रमाणे मिरजोळी ग्रा.पं.ची कचरा उचलण्याची व्यवस्था नसल्याने गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणार्या रहिवाशांची गैरसोय होत होती.
मिरजोळी ग्रा.पं. या समस्येवर आता उपययोजना केली असून आपल्या हद्दीन मंगळवारपासून कचरा उचलणयासाठी घंटागाडी फिरवणयास सुरु केली आहे. ग्रामपंचायतीच्या या संदर्भातील निर्णयाचे ग्रा. पं. हद्दीतील गृहनिर्माण सोसायट्यांनी स्वागत केले असून सरपंच रत्नदीप पाटील यांचे आभार मानले आहेत.