MSRTC | रत्नागिरी एसटी आगारात १२ ऑगस्टला प्रवासी राजा दिन साजरा होणार
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ‘प्रवासी राजा दिन’ या उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
उपक्रमात प्रवासी वर्ग, प्रवासी संघटना, शाळा, महाविद्यालये, इतर अनेक सामाजिक संस्था यांनी त्यांच्या एसटी संबंधित सूचना, तक्रारींसाठी परिपत्रकात *रत्नागिरी आगारासाठी सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४ या दिवशी सकाळी १० ते २ या वेळेत* विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक हे उपस्थित असणार आहेत तरी रत्नागिरी तालुक्यातील तमाम प्रवासी वर्गाला आवाहन करण्यात येत आहे की, सर्वांनी हजर राहून आपल्या समस्या,अडचणी मांडाव्यात, जेणेकरून सर्व प्रकारच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांचे योग्य ते निराकरण करण्यासाठी महामंडळाला मदत होईल व चांगली सुविधा प्रवासी वर्गाला देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील राहील.
ठिकाण : माळनाका एसटी आगार, रत्नागिरी
वेळ :- सोमवार दिनांक १२/०८/२०२४ रोजी सकाळी १० ते २.