https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात डॉ. तानाजीराव चोरगे कॉलेजची सलग तिसऱ्या वर्षी विजयी परंपरा कायम

0 313

लोकनृत्य प्रकारात विजयाची परंपरा ठेवली कायम

खेड : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५७ व्या सांस्कृतिक युवा महोत्सव २०२४-२५ च्या उत्तर रत्नागिरी झोन ०९ ची प्राथमिक फेरी आय.सी.एस. महाविद्यालय खेड, जि. रत्नागिरी येथे दि. २ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाली. उत्तर रत्नागिरी झोन ०९ मध्ये एकूण २० महाविद्यालयानी विविध कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदविला. त्यामध्ये कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे, डॉ तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी पालवण ता. चिपळूण, जि. रत्नागिरी यांनी त्रिपुरा राज्यातील ‘ममिता’ हे लोकनृत्य या कला प्रकारामध्ये तृतीय क्रमांक पटकाविला.

या नृत्यातील सर्व विद्यार्थ्यांची निवड मुंबई विद्यापीठ येथे होणाऱ्या अंतिमसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. नंदा कांबळे, प्रा. सोनल सुर्वे, कोरियोग्राफर सागर कुंभार, राहुल भुवड, प्रा. संदिप येलये, प्रा. सानिया मुल्लाजी, प्रा. श्वेता सकपाळ, प्रा. धनश्री सुर्वे, श्री. राजेंद्र सुर्वे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाची व सांस्कृतिक विभागाच्या कार्याची दखल घेत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष मा. डॉ. निखिल चोरगे, सचिव श्री. मिलिंद सुर्वे, अधिक्षक श्री. प्रफुल्ल सुर्वे, गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, सर्व संचालक पदाधिकारी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला

Leave A Reply

Your email address will not be published.