परचुरीतील नवनिर्माण नाट्य मंडाळाने ४६ वर्षे जपली नाट्य परंपरा
➡️ वेल्येवाडीमध्ये झाला महाराष्ट्राचा बहुरुपी नाटकाचा प्रयोग !
➡️ नवनिर्माण नाट्य मंडाळाची यशस्वी ४६ वर्षांची वाटचाल!
संगमेश्वर (सचिन यादव): संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथील नवनिर्माण नाट्य मंडाळने ग्रामीण भागात स्थानिक कलावंताना सोबत घेत तब्बल ४६ वर्षे नाट्य परंपरा जोपासली आहे.
परचुरी वेल्येवाडी येथे सालाबादप्रमाणे यंदाही दर्श अमावास्येला वाडीची सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती.
गावातील नवनिर्माण नाट्य मंडाळाने आपली ४६ वर्षांची परंपरा अखंडित सुरू ठेवली आहे.
नाटकाची प्रथा १९७६ साली ‘जयचंडी’ या नाटकाने प्रारंभ केला
तेव्हापासून गेली ३० वर्ष नवनिर्माण नाट्य मंडळ ऐतिहासिक नाटकं सादर करत आहेत.
१९८५ साली भास्कर राणे लिखीत महाराष्ट्राचा बहुरुपी हे छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या नाटकानं ऐतिहासिक नाटकाची सुरुवात केली गेली.
तेव्हापासून आजतागायत हे मंडळ ऐतिहासिक नाटकं सादर करत आले आहे.
नाटकातील पात्रे हि स्थानिक कलाकार आहेत.
यावेळच्या नाट्य प्रयोगाला कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य यांनी खूप मेहनत घेतली.