देशातील राज्यांना भेटी देऊन तेथील संस्कृती समजून घेणे आवश्यक : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई : देशातील राज्ये समजून घेण्यासाठी त्या राज्यांना प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे व तेथील संस्कृती लोकांमध्ये राहून समजून घेतली पाहिजे. नागालँड व आसाम या राज्यांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद वाढवल्यास राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून मुंबईत राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत नागालँड (१ डिसेंबर) व आसाम (२ डिसेंबर) राज्य स्थापना दिवस संयुक्तरित्या साजरा करण्यात आला.