संगमेश्वर पोलीस ठाण्यातर्फे स्पर्धेचे आयोजन
संगमेश्वर : संगमेश्वर पोलीस ठाण्यात तर्फे परिसरातील माध्यमिक शाळासाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरचा विद्यार्थी गणेश शरद वाडकर याच्या चित्राला विशेष प्राविण्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतेच त्याला भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
गणेश शरद वाडकर याला बालपणापासूनच चित्रकलेची आवड असून त्याची निवड रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शोध कलारत्नांचा या उपक्रमात देखील झाली आहे. तालुका आणि जिल्हा स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध चित्रकला स्पर्धेत तो भाग घेत असतो. त्याच्या या यशाबद्दल व्यापारी पैसा फंड संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदिनी गणेश याचे अभिनंदन केले आहे.