जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला उद्या पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार!
मुंबई : पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी हे जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला दिनांक ३० डिसेंबर २०२३, रोजी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करणार आहेत.
मध्य रेल्वे आपल्या सर्व स्थानकांवर जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करणार आहे.
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी, दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार असून ते अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरून २ अमृत भारत एक्सप्रेस व ६ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील.
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी, दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील.
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी, ३० डिसेंबर २०२३ रोजी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरून इतर शहरांदरम्यान २ अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. त्याचा तपशील खालीलप्रमाणे :
१. दरभंगा ते अयोध्या-दिल्ली (आनंद विहार टर्मिनल) अमृत भारत एक्सप्रेस.
२. मालदा टाउन ते बेंगळुरू छावणी अमृत भारत एक्सप्रेस.
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी दिनांक ३० डिसेंबर २०२३, रोजी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरून विविध शहरांसाठी धावणाऱ्या ६ नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्याचा तपशील खालीलप्रमाणे:-
१. श्री माता वैष्णो देवी कटरा – नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस
- अमृतसर – दिल्ली जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस
- कोईम्बतूर – बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस
- मंगळुरु – मडगाव (गोवा) वंदे भारत एक्सप्रेस
- अयोध्या धाम जंक्शन – आनंद विहार टर्मिनल (दिल्ली) वंदे भारत एक्सप्रेस
- जालना – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेस
जालना – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेस
शुभारंभ फेरी
दिनांक ३० डिसेंबर २०२३ (शनिवार), रोजी ८ वंदे भारत डब्बे असलेली जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस क्रमांक ०२७०५ (एकमार्गी) ही विशेष ट्रेन खालील तात्पुरत्या वेळापत्रकानुसार धावणार आहे :
स्थानके – आगमन/निर्गमन
जालना :- ११:०० तास
औरंगाबाद :- ११:५५ तास/११:५७ तास
मनमाड जंक्शन :- १३:४२ तास/१३:४४ तास
नाशिक रोड :- १४:४४ तास/१४:४६ तास
कल्याण जंक्शन :- १७:०६ तास/१७:०८ तास
ठाणे :- १७:२८ तास/१७:३० तास
दादर :- १७:५० तास/१७:५२ तास
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई :- १८:४५ तास/–
दिनांक ३० डिसेंबर २०२३, रोजी जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ मध्य रेल्वेच्या मनमाड जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या सर्व स्थानकांवर खासदार, आमदार, पालकमंत्री, शालेय विद्यार्थी आणि स्थानिकांच्या हस्ते स्वागत करण्यात येईल.