उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे ) : कु.सारा विकास पाटील ही ग्रामिण भागात राहणारी पाणदिवे, तालुका उरणची रहिवासी आहे.ती १३ वर्षांची आहे. ती एस. बी. पी.सिबर्ड दिव्यांग मुलांची शाळा बोरी उरणमध्ये शिक्षण घेते. सारा दिव्यांगावर मात करत उत्तम प्रकारे स्विमिंग करते. यासाठी तिचे कोच अक्षय सर व विजय सर मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे पालकांच पण योगदान महत्वाचं आहे.
साराने विजय विकास सामाजिक संस्थेच्या जलतरण स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक काढला. तसेच वाय.एम.सी.ए. बेलापूर येथील जलतरण स्पर्धेत तीन प्रकारात गोल्डमिडल मिळवले.सारा पाटीलने नागपूर येथे आत्ताच पार पडलेल्या स्पेशल ऑलंपिक भारत राज्यस्पर्धेत भाग घेतला. तिचा लहान गट सोडून तिला १६ ते २१ वयोगाटात स्पर्धेसाठी उतरविण्यात आली.
या जलतरण स्पर्धेत सारा पाटीलने ‘फ्रिस्टाईल व बॅकस्ट्रोक’ प्रकारात तिसरा क्रमांक मिळवला.सारा पाटीलचे जागतिक पंच अभिजीत तांबे यांनी अभिनंदन केले व अशिर्वाद दिले. साराचे तिच्या शिक्षकांनी,गावातून तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी,पालकांनी, नातेवाईकांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.क्रीडा क्षेत्रात सुयश प्राप्त केल्याने सारा पाटील हिच्यावर सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.