रत्नागिरी : सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेल्या ॲड. पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांनी एलएलबीची पदवी प्राप्त केल्यानंतर लंडन येथील वेस्ट मिनस्टर विद्यापिठात कायद्याच्या उच्च पदवी (एलएल.एम) साठी प्रवेश मिळविला होता. त्यांनी लंडन येथे जाऊन तेथील विद्यापीठामध्ये हा अभ्यासक्रम इंटरनँशनल अँण्ड कमर्शियल आर्बीट्रेशन लॉ हा विषय घेऊन यशस्वीरीत्या उच्च प्रथम श्रेणी मिळवून (डिस्टींग्शन) पूर्ण केला. त्यांना या पदवी परिक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे 11 नोव्हेंबर 2024 रोजी लंडन येथे पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
ॲड. पृथ्वीराज रावराणे हे सिंधुदुर्गातील प्रतिथयश वकील अँड. राजेंद्र रावराणे यांचे जेष्ठ पुत्र असून त्यांनी प्रथम आँटोमोबाईल विषयात अभियांत्रिकी पदवी (बी.ई.) प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी वकीलीची एलएल.बी ही पदवी प्राप्त केली असून तद्नंतर कायद्याची उच्च पदवी (एलएल.एम) ही लंडन येथे जाऊन प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी आपले वडील अँड. राजेंद्र रावराणे यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबई उच्च न्यायालयात आपला व्यवसाय सुरू करणे पसंत केले असून त्या आधारे जिल्ह्यातील लोकांची सेवा करणे हा त्यांचा मानस आहे.