चिपळूण : तालुक्यातील कळवंडे धरणावर शुक्रवारी सकाळपासूनच घसरलेल्या अश्मीपटलच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या कामात व्यत्यय आला होता. गुरुवारी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या ठिकाणाला भेट दिल्यानंतर या कामाला वेग झाला आहे.
दरम्यान धरणाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते. मागील काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे या कामात अडसर आला होता. मात्र शुक्रवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्यामुळे या कामाला वेग आला आहे