- लांजा कृषी केंद्राच्या जागेतच होणार संशोधन केंद्र : पालकमंत्री उदय सामंत
लांजा : लांजातील फणस संशोधन केंद्राला राज्य शासनाकडून मंजूरी देण्यात आली असून लांजा कृषी केंद्र जागेतच पण समजून केंद्र होणार असल्याची माहिती आज लांजा येथे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली लांजा येथे कृषी महाविद्यालय होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
लांजा तालुक्यातील फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव रखडला होता. यावर चिपळूण आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात फणस संशोधन केंद्राबाबत लक्षवेधी मागणी केली होती. या केंद्राच्या प्रस्ताव राज्य शासनाला कोकण कृषी विद्यापीठाने सादर केलेला असून अद्याप या केंद्राच्या जागेचा प्रश्न अजूनही निकालात नाही. राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळत नसल्याने बहुचर्चित फणस संशोधन केंद्र रखडले आहे अद्यापही या केंद्राची जागा कुठे निश्चित करावी, याची स्थिती नाही.
पावसाळी पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा करून मूर्त स्वरूप यावे असे मागणी लांजातील शेतकऱ्यांनी केली होती.
आज लांजा येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी पालक मंत्री उदय सामंत आले होते. पत्रकारांनी याबत लक्ष वेधले असता पालकमंत्री यांनी लांजा येथे फणस संशोधन केंद्र मंजुर झाले असल्याचं सागितलं लवकरच अंमलबजाणी होणारं असल्याचं सागितले.