https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

महाविद्यालयीन मुलींकरिता बनवलेल्या बागेत राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून बसविण्यात आले पक्षी-प्राण्यांचे पुतळे !

0 74

उरण (विठ्ठल ममताबादे ) : समाजसेवी व्यक्तिमत्व राजू मुंबईकर यांच्या प्रयत्नातून महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल या कॉलेज मधील खास मुलींकरिता ( विद्यार्थीनी करिता ) बनविण्यात आलेल्या बागेत ( गार्डन मध्ये )गाय ,वासरू या प्राण्यांचे आणि फ्लेमिंगो या पक्षाचे पुतळे बसविण्यात आले.

सामाजिक क्षेत्रात आपल्या चौफेर गुणांनी अनेक समाजपयोगी कार्य करत अल्पावधीतच आपल्या नावाचा एक वेगळाच ठसा उमटविणारे समाजसेवी व्यक्तिमत्तम म्हणजेच केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान जितकं उल्लेखनीय तितकचं शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य देखील प्रशंसनीय आहे. मग ते वाडी – वस्तीवरील आदिवासीं मुलांच्या शिक्षणा करिता त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप असोत किंवा त्यांनी घेतलेल्या ४६ ( सेहचाळीस) आदिवासीं दत्तक मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च असो अशी अनेक प्रकारची समाजहित जपणारी कार्य करत असतानाच आज पुन्हा एकदा एक कार्य साकारलं गेलं ते राजू मुंबईकर यांच्या प्रयत्नातून महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल या कॉलेज मधील खास मुलींकरिता ( विद्यार्थीनी करिता ) बनविण्यात आलेल्या बागेत ( गार्डन मध्ये )गाय ,वासरू या प्राण्यांचे आणि फ्लेमिंगो या पक्षाचे पुतळे बसविण्यात आले.

निसर्गाच्या कुशीत वसलेले रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल या कॉलेज मध्ये आज पर्यंत राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून आज पर्यंत अनेक कार्यक्रम साकारले गेले त्यामध्ये वृक्षारोपण असेल,सापां बद्दल असणारे समज आणि गैरसमज ह्या विषयावर विद्यार्थ्यां करिता प्रबोधनात्मक व्याख्यान असेल अश्या प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत ह्या कॉलेज सोबत त्यांचं नातं जोडलं गेलं आहे.

शिक्षण क्षेत्रातील महर्षी व्यक्तिमत्त्व आणि या कॉलेजचे प्राचार्य गणेशजी ठाकूर सर यांच्या सारख्या उच्चविभूषित प्राचार्यांच्या आणि सर्व शिक्षकवृंदाच्या मेहनतीतून शिक्षणाच्या ज्ञान गंगेत ज्ञान दानाचं पवित्र कार्य करत अनेक यशस्वी, कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल या कॉलेजच्या बागेत ( गार्डन मध्ये ) मध्ये प्राणी पक्षांचे पुतळे बसवून या निसर्गरम्य कॉलेजच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल आणि कॉलेजचं सुंदर रूप आणखीनच उठून दिसेल एवढं मात्र नक्की!

राजू मुंबईकर यांच्या औदार्यातून साकारलेल्या ह्या कार्यक्रमा करिता कॉलेजचे प्राचार्य गणेश ठाकूर सर,राजू मुंबईकर,पुष्पलता मढवी ,जयश्री गणेश ठाकूर, आशा मेणकर, डॉ.अंजलीजी टकले, संगिता ठाकूर ,डॉ.प्रफुल्ल वशेणीकर सर आणि सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.