Ultimate magazine theme for WordPress.

बारावी परीक्षेच्या पहिल्या पेपरनंतर विद्यार्थिनीची आत्महत्या

0 36

रत्नागिरीतील घटनेने खळबळ

रत्नागिरी : बारावी परीक्षेचा अभ्यास करायला खोलीत जाते, असे सांगून कारवांचीवाडी येथे बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्यानेखळबळ उडाली आहे.

ही घटना शनिवार 5 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजण्याचा सुमारास उघडकीस आली. वैष्णवी दयाराम श्रीनाथ ( 21, राहणार संकल्पनगर कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे तरुणीचे नाव आहे.
या बाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. वैष्णवी ही बारावीला असून तिची परीक्षा सध्या सुरू होती. 4 मार्च रोजी इंग्रजीचा पेपर दिला होता. 5 मार्च रोजी सकाळी ती अभ्यास करायला रूममध्ये गेली होती. परंतु बराच वेळ झाला तरीही ती बाहेर न आल्याने तिच्या नातेवाईकांनी रूममध्ये जाऊन पाहिले असता तिने पंख्याला ओढणीने  गळफास घेतलेली आढळली. तिच्या आत्महत्येमागील कारण समजलेले नसून अधिक तपास पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.