Ultimate magazine theme for WordPress.

गणपतीपुळे समुद्रात बुडता बुडता सातारच्या चौघाना वाचविले

0 42

किनाऱ्यावरील जीवरक्षकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणाऱ्या चार पर्यटकांना वाचविण्यात गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्टच्या जेसकी बोटचालकांना यश आले. ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

बुडताना वाचविलेले सर्वजण सातारा जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट नांदवडे तालुका कोरेगाव येथील रहिवासी आहेत. गणेश सुतार (३५) शमाली सूर्यवंशी,(३८) मृदुला सूर्यवंशी (१८) व मंदी सूर्यवंशी (१४) अशी त्या चार जणांची नावे आहेत.

या चारही जणांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला असता समुद्राकिनाऱ्यावर असलेल्या जेसकी बोट चालकांचे लक्ष त्यांचेकडे वेधले असता ते पूर्णपणे बुडत असल्याचे दिसून आले. यावेळी क्षणाचा ही विलंब न लावता जेसकी बोट चालकांनी आपली बोट खोल समुद्रात नेऊन आपली धाडसी कामगिरी करत त्या चार जणांना मरणाच्या दाढेतून बुडताना वाचवले. यावेळी गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने व गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक पवार यांनी ही बोडणाच्या पर्यटकांना वाचविण्यासाठी जेसकी बोट चालकांना मोलाची मदत केली यांतील गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने व गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक श्री. पवार यांनी खोल समुद्राच्या पाण्यात गेलेल्या त्या चार जणांना खोलवर पाण्यात जाऊ नका, असा इशारा दिला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आपला अतिरेक व बेजबाबदारपणा दाखवत त्या चार ही जणांनी जीवरक्षक व सुरक्षारक्षकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांच्यावर बुडण्याची वेळ येऊन ठेपली. एकूणच पर्यटकांचा अतिउत्साहीपणा व बेजबाबदारपणा आणि जीवरक्षक आणि सर्वच स्थानिक व्यावसायिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्याचे चित्र आजही दिसून येत आहे.

याबाबत ठोस उपायोजना करण्याची गरज आहे.या घटनेची माहिती मिळताच गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी सागर गिरीगोसावी व होमगार्ड अमेय शिवगण यांनी तत्काळ समुद्रकिनारी भेट देऊन बुडणाऱ्या पर्यटकांविषयी माहिती घेतली तसेच समुद्र किनाऱ्यावर असलेल्या इतर पर्यटकांना खोल पाण्यात न जाण्याचे आवाहन केले.

गेल्या अनेक दिवसांपासून गणपतीपुळे ग्रामपंचायतीने दहा जीवरक्षकांना ब्रेक दिल्याने जीवरक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यातच केवळ दोन जीव रक्षकांना गेल्या दहा दिवसापूर्वी गणपतीपुळे ग्रामपंचायतीने समुद्रकिनाऱ्यावर कामगिरीसाठी तैनात केले आहे मात्र या दोन जीव रक्षकांना समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात असणार्‍या पर्यटकांना थोपविण्याची जबाबदारी पेलता येणारी नाही .एकूणच दोन जीवरक्षक बुडणाऱ्यांना वाचविण्यात कमी पडू शकतात.त्यामुळे जीवरक्षकांची संख्या वाढविण्याची गरज असताना गणपतीपुळे ग्रामपंचायतीने दोन जीवरक्षकांना ठेवून आठ जीवरक्षकांना कमी केल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरच आला आहे . मात्र गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या मोरया वॉटर स्पोर्टच्या वेगवान बोटी सध्या कार्यरत असल्याने या बोट चालकांकडून बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्याचे काम मोठ्या सामाजिक भावनेतून व माणुसकीच्या द्वारे केले जाते केले जाते एकूणच रक्षकांच्या तुलनेत मोरया वॉटर स्पोर्टच्या बोट चालकांकडून पर्यटकांना वाचविण्याची धाडसी कामगिरी गेल्या अनेक दिवसांपासून केली आहे त्यामुळे कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्रच विशेष अभिनंदन होत आहे. एकूणच गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळच्या सुमारास बुडणाऱ्या चार पर्यटकांना वाचविल्यानंतर आता यापुढील एप्रिल व मे च्या दरम्यान मोठ्या गर्दीचा हंगाम मानला जात आहे .त्यातच शासनाने निर्बंध ही शिथिल केल्याने आता मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ गणपतीपुळे तीर्थक्षेत्री सुरू आहे या कारणाने आलेले सर्वच ठिकाणचे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर उतरून समुद्रस्नानाचा आनंद घेतल्याशिवाय जातच नाही त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी समुद्रकिनाऱ्यावर ज्यादा जीव रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी येथील सर्वच स्थानिक पर्यटन व्यावसायिक व ग्रामस्थांमधून केली जात आहे याकडे याकडे गणपतीकडे ग्रामपंचायतीने कटाक्षाने लक्ष घालून पुन्हा एकदा विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.