पुण्यातील खेलो इंडिया रग्बी वूमेन स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंचे यश
गुहागर : दि. ८ ते १० डिसेंबर २०२३ रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे खेलो इंडिया रग्बी वुमन लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आयोजक कमिटीसाठी पूजा भाले, शिखा ठक्कर, डॉ. योगिता खाडे, व्हाबीज बरूच्या यांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेस राज्यातील रग्बी संघ खेळणार असुन रत्नागिरी जिल्हयात १४ वर्ष मुलींचा संघाची निवड करण्यात आली होती.
यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आर्या गोरे, सानवी भोसले, संस्कृती कोकरे , भार्गवी पवार, झेनब तांबोळी (रत्नागिरी), श्रावणी शितप, रिया पवार, शिफा खान, मासूमा बेबल, (चिपळूण), अन्वी जानवलकर, मंजिरी जानवलकर (गुहागर), सृष्टी मोरे (खेड) या मुलींनी उत्कृष्ट खेळ केला.
संघ प्रशिक्षक गणेश राठोड, टीम मॅनेजर म्हणून नीता यादव, जिल्हा रग्बी असोसिएशनचे नेतृत्व केले. रत्नागिरी जिल्हा रग्बी असोसिएशनचे सचिव, आणि जिल्हा मुख्य प्रशिक्षक डॉ. योगिता खाडे तसेच प्रशिक्षक विनोद राऊत, मंदार साळवी, प्रणित सावंत, हूजेफा ठाकूर, स्वप्नाली पवार, चेतन घाणेकर,शशिकांत उदेग, गणेश राठोड,स्वानंद खेडेकर, अजित धावडे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
इंडिया रग्बी व महाराष्ट्र रग्बीचे श्री. संदीप मोसमकर, नासीर हुसेन, मिनाल पास्ताला, शेरजात रबाड़ी, विकास चौरसिया सर, ईश्वराज कोठारकी, रत्नागिरी जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश माटे, उपाध्यक्ष फकीराभाई वणू, सचिव डॉ. योगिता खाडे, समीर काझी, खालीद दाभोळकर यांनी खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.