रत्नागिरीतील सागरी विद्यापीठ स्थापनेच्या घडामोडी वेगवान
जागा निश्चित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे आदेश
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांबाबत शुक्रवारी मुंबईतील सिंहगड येथील शासकीय निवासस्थानी उच्च स्वतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिले. यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात सागरी विद्यापीठ कायदा विधिमंडळात आणला जाईल, असे यावेळी आश्वस्त केले.
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय स्थापन करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.
या बैठकीला रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा : Mumbai-Goa Highway | जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केली परशुराम घाटाची पाहणी