Ultimate magazine theme for WordPress.

लांजा-साटवली मार्गावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक दोन तास बंद

0 370

शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फटका

लांजा : लांजा- साटवली मार्गावर बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मोठे झाड पडल्याने मार्गावरील दोन तास वाहातूक ठप्प पडली होती.या घटनेमुळे शाळकरी, महाविद्यालयीत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या इसवली व गोळवशी या दोन बस दोन तास उशिराने धावल्यामुळे मुलांचे नुकसान झाले.

बुधवारी सकाळी लांजा-साटवली मार्गावर कोंडये पालयेवाडी येथे मोठे झाड पडले. लांजा ते साटवली व साटवली ते लांजा अशी दोन्ही बाजूची वाहतूक बंद पडली होती. दोन तास झाले तरी पडलेले झाड हलविण्यात आले नव्हते. लांजा हायसस्कुल, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या इसवली व गोळवशी या दोन बस अडकल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजमध्ये जाण्यासाठी तीन तास उशीर झाला.

स्थानिक नागरिकांना माहिती मिळताच नागरिकांनी पडलेले झाड तोडून बाजूला हटवले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाड तोडून मार्ग वाहतुकीला खुला करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.