https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

लांजा-धुंदरे-दाभोळ मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन दुर्मिळ उदमांजरांचा मृत्यू

0 703

लांजा : लांजा धुंदरे दाभोळ मार्गावर अज्ञात वाहनाची धडक बसून दुर्मिळ प्रजातीमधील दोन उदमांजरांचा मृत्यू झाला आहे. वन विभागाने या दुर्मिळ प्राण्यांना चिरडणाऱ्या वाहनाचा शोध सुरू केला आहे.

रविवारी लांजा धुंदरे दाभोळ मार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या सदृश दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना झाली होती. प्राणीमित्र उदय पाटोळे, सिराज नेवरेकर यांनी दोन दुर्मिळ प्राण्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन कोणता प्राणी असावा, यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे माहिती अहवाल मागवला होता. रविवारी सकाळी धुंदरे रस्त्यावर दोन प्राणी यांना चिरडून वाहन गेल्याचे वाहनधारक यांच्या लक्षात आल्यावर प्राणीमित्र यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना दिली. आरेकर यांच्या निदर्शनास आणून दिले आरेकर यांनी सकृतदर्शनी रानमांजराची पिल्ले असण्याची शक्यता वर्तविली होती. पशुसंवर्धन अधिकारी श्रीमती प्राजक्ता बर्वे, वनरक्षक श्री. वाघाटे यांनी मृत दोन प्राण्यांचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यात आले बिबट्या सदृश असलेले प्राणी हे दुर्मिळ असे उदमांजर असल्याचे स्पष्ट झाले. त्या दोन प्राण्यांना दफन करण्यात आले

उदमांजर (मसण्या उद) नावाचा प्राणी


मराठी नाव -: उदमांजर (मसण्याउद)
इंग्लिश नाव -: Asian Palm Civet
शास्त्रीय नाव -: Paradoxurus hermaphroditus 
यांचा रंग साधारण काळसर मातकट असतो आणि काहीकाही ठिकाणी यांना चक्क पूर्ण काळेदेखील पाहिले गेले आहे. मातकट रंगाच्या यांच्या पाठीवर काळे पट्टे असतात. या प्राण्याला लांब शेपटी असते. टोकाकडे काळसर असलेली मातकट शेपटी झुपकेदार असते. यांचे पंजे काळ्या रंगाचे असतात तर पायावर भुरकट ठिपके असतात. संपुर्ण अंगावर चरबरीत राठ केस असलेलं याच ध्यानं साधरंण २ ते २/५  फ़ुटापर्यत वाढते याचं वजन ४/५ किलोच असते. या प्राण्याच वैशिष्ट्य म्हणजे याला स्वत:च्या मिशा पुढेमागे हलवता येतात. आणि याचं नाक नी डोळे खुपच चांगले असतात. ही उदमांजर स्वत:च्या हद्दी आखून घेतात. यासाठी गुदद्वाराजवळ असलेल्या ग्रंथीचा वापर ते करतात . जमिनीवर हा भाग घासून स्वत:ची हद्द ते आखून देतात. 
पूर्व अशियन खंडात आढळणरा हा प्राणी भारताच्या बहुतांश भागात आढळतो. आता हा प्राणी आपल्याला हा प्राणी नेहेमी का दिसत नाही असा प्रश्न कुणालाही  पडू शकतो. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा प्राणी निशाचर [ Nocturnal ] आहे. आणि खुपच लाजरा आहे आणि दुसर उत्तर म्हणजे, हे प्राणी जमिनीत बिळ करून किंवा झाडांच्या ढोलीत रहातात. यामुळे ते पट्कन नजरेस येत नाहीत. आपल्याकडे आढळणाऱ्या या उदमांजर प्राण्याच्या  जगभर वेगवेगळ्या २५/३० उपजाती नोंदवल्या गेल्या आहेत.  

उदमांजरांचे खाद्य

हा प्राणी मिश्र आहारी आहे, मिश्र आहार म्हणजे,  अर्थात  शाकाहार नी मांसाहार. सिवेटला शाकाहारामधे झाडाची फ़ळे, फ़ुले आवडतात आणि मांसाहार म्हणजे खेकडे , उंदीर , बेडूक, किडे, पाली, लहानसहान साप आणि कधीकधी पक्षी आणि त्यांची अंडी यांना आवडतात. आपल्या देशात १९७२ च्या भारतीय वन्यजीव कायद्याने याला संरक्षण मिळाले असल्याने ह्याला पाळणे, मारणे गुन्हा आहे आज वनविभाग अधिकारी दिलीप आरेकर यांनी वन्यजीव कायद्यानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल होणार आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे

Leave A Reply

Your email address will not be published.