उरण (विठ्ठल ममताबादे ) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व करा महाविद्यालयातील या जीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने युटोपिया या महोत्सव नुकताच संपन्न झाला. उद्घाटन कार्यक्रमात रमेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए.शामा यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना चालना द्यावी असे सांगितले. प्रा. व्ही. एस. इंदुलकर यांनी महोत्सवाचा इतिहास सांगितला.
महाविद्यालयात मागील पाच वर्षापासून युटोपिया महोत्सव आयोजित केला जातो. या वर्षीच्या महोत्सवाची थीम बर्फ प्रदेश ही होती. अतरंगी, रिल्स, फोटोग्राफी, आर्टिस्ट विदाऊट ब्रश, मास्टर शेफ, शार्क टेन्क, आर्ट अटॅक, अंदाज-ए- बयान इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले. अतिशय वेगळ्या व तरुणाईत अत्यंत आकर्षण निर्माण करणाऱ्या स्पर्धा महोत्सवात आयोजित केल्या गेल्या.
समारोप कार्यक्रमात क्षेत्र समन्वयक डॉ.बी. एस. पाटील (सिकेटी महाविद्यालय, पनवेल) यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व अशाच पद्धतीने उत्साही राहून जीवन जगले पाहिजे असे सांगितले. प्राचार्य के. ए. शामा यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. रमेश ठाकूर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. उपस्थितांचे आभार अजीवन अध्ययन विभाग प्रमुख प्रा. व्हि.एस. इंदुलकर सर यांनी व्यक्त केले.
समारोपीय कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. आय.क्यू. ए.सी समन्वयक डॉ. ए.आर.चव्हाण सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अकाउंटंट अँड फायनान्स विभागातील प्रा. रियाज पठाण, प्रा. हन्नज शेख,प्रा. विनिता तांडेल, प्रा. नीलोफर मुकरी, प्रा. पूजा गुप्ता आदी व डीएलएलई विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.