श्रीसंताजी जगनाडे महाराज सेवा संस्था रत्नागिरीचा कसोप गावात दौरा
रत्नागिरी : श्रीसंताजी जगनाडे महाराज सेवा संस्था, रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. बावा नाचणकर, सदस्म उदय बसणकर खजिनदार प्रभाकर खानविलकरसर, सचिव शरद कोतवडेकर आदींनी कसोप गावांत जाऊन आपल्या ज्ञाती बांधवांची भेट घेतली. यावेळी तेथील ज्ञाती बांधवांच्या श्री महालक्ष्मीच्या मंदीरात जाऊन आरतीमध्ये सहभाग घेऊन दर्शन घेतले.
यावेळी उपस्थित बांधवांना नवीन संस्थेच्या उद्देशांची कल्पना दिली सदर संस्था निर्माण करण्याची आवश्यकता सांगितली त्याचप्रमाणे संस्थेची सन 2024 ची कॅलेंडर मोफत वाटप करणेत आले.
यावेळी कसोप, गांवातील महेश शेलार , मधुकर शेलार, कार्यकर्त्या कु. पूजा शेलार, रविंद्र शेलार, पांडुरंग शेलार, विनोद शेलार, प्रशांत शेलार, लहू शेलार, सदानंद शेलार, दिवाकर शेलार, ऋषिकेश शेलार, सुरेश गो. शेलार, परेश शेलार,सिध्देश श्रीधर शेलार, राहूल शेलार, सिध्देश राजेंद्र लांजेकर, कौशल पावसकर, गणेश शेलार, रविंद्र हरी शेलार इत्यादी ज्ञाती बांधव उपस्थित होते. नवीन संस्थेबद्दल उपस्थित ज्ञाती बांधवांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. संस्थेचे कार्य पुढे नेण्यास आम्ही कटीबध्द असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.