उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : भारतीय निवडणूक आयोगाच्या स्वीप उपक्रमा अंतर्गत नुकताच उरण तालुक्यातील इक्रा हायस्कूलमध्ये मतदान जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.निवडणूक कोणतीही असो या निवडणुकीत मतदान करून आपली लोकशाही बळकट करायला हवी. कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजवायला हवा. “मेरा व्होट मेरी पहचान” अशी ओळख लोकशाहीच्या सर्वात मोठ्या सणात म्हणजे निवडणुकीत मतदाराने करायला हवी अशा प्रकारची मतदान करण्या बाबत जनजागृती उपस्थित पालक वर्गात करण्यात आली.
या वेळी इक्रा हायस्कूलचे १६० हून अधिक पालक उपस्थित होते.या उपस्थित पालक वर्गाला मतदान का करावे ? या बाबत उरण तालुका गटशिक्षणाधिकारी प्रियांका म्हात्रे तसेच मार्गदर्शक पदवीधर शिक्षक मच्छिंद्रनाथ म्हात्रे व किशोर पाटील यांनी मार्गदर्शन केले.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
या कार्यक्रमास नवीन शेवे केंद्राचे केंद्र प्रमुख श्री.पवार सर,इक्रा हायस्कूलच्या प्राचार्य फरहत तुंगेकर,सहाय्यक शिक्षिका अंशू सहतीया,मनिषा मुसळे,पालक प्रतिनिधी तजीन सोंडे,सुंबुळ तुंगेकर आदि मान्यवर उपस्थित होते.