रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनला संलग्न असलेली अधिकृत संघटना रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिग सेंटरने १४५ सुवर्ण, ८१ रौप्य तर ३९ कांस्य पदके संपादन करून फिरता चषक पटकावला आहे.
युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर, ओम साई मित्र मंडळ सभागृह साळवी स्टॉप या तायक्वांदो प्रशिक्षण वर्गाने पदकांची लय लूट करून फाईटमध्ये प्रथम, पूमसेमध्ये द्वितीय क्रमांक तर फ्री स्टाइल पुमसेमध्ये प्रथम क्रमांक
पटकावला. या यशामुळे तायक्वांदोचा मानाचा समजला जाणारा फिरता चषक सलग दोन वर्ष युवा मार्शल आर्ट यांनी मिळवला.थोडी थोडकी नव्हे तर तब्बल २६५ पदके संपादन करून युवा तायक्वांडो रत्नागिरीने तायक्वांदोचा मानाचा फिरता चषक फटकावल्याने खेळाडूंवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.