उरणमध्ये राज्यस्तरीय साहित्य स्पर्धेचे आयोजन
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे ) : साहित्य आणि वाचन चळवळ वृध्दींगत व्हावी यासाठी कटीबध्द असणार्या झुंजार युवा मंच उरण यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साप्ताहिक झुंजार मत दिवाळी अंकाच्या निमित्ताने साहित्य स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यासाठी नावाजलेल्या आणि नवोदित लेखकांकडून साहित्य मागविण्यात येत आहे.
आई वडील या एकाच विषयावर आधारित लेख , मुलाखती , कविता आदी प्रकारचे साहित्य मागविण्यात आले आहे . या लिखाणामध्ये शक्यतो शेवटी बाप हा बापच असतो , आई – बाप कुठे काय करतात नाही का ? , आई – बाप झालेला माझा बाप , शेतावर रक्ताचं पाणी शिंपडणारा माझा बाप , कुणी माय बाप देता का माय बाप ! , आई बाप नक्की असतात तरी काय ?, आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा अशा प्रकारच्या विषयांची अपेक्षा आहे . त्याचबरोबर कष्टकरी समाजाचे जगणे रेखाटणारे लिखाण , कष्टकरी समाजावर होणाऱ्या अन्यायावर झालेले लढे ( उदा.1984 चे शेतकरी आंदोलन ) , चरीचा संप , सामाजिक समस्यांवर प्रबोधनात्मक लिखाण अपेक्षित आहे . सोबत कथा , कविता , चारोळ्या , लघू साहित्य , मालवणी भाषेतील साहित्य , आगरी बोली भाषेतील साहित्य आदी प्रकारचे साहित्य मागविण्यात येत आहे. साहित्य 200 ते 250 शब्द मर्यादेचे असावे . योग्य त्या साहित्याला मंचाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या साप्ताहिक झुंजार मत नामक दिवाळी अंकात स्थान देण्यात येणार आहे . सोबतच आगरी, कोळी बोलीतील साहित्याला प्राधान्य क्रमाने स्वीकारले जाणार आहे.
साहित्यिकांनी आपले साहित्य युनिकोड या इंग्लिश टू मराठी या भाषेत टाईप करून ajitdadapatil@gmail.com या ईमेल आय डी वर अथवा 9892393553 या व्हाट्स अप क्रमांकावर पाठवावे किंवा आपले साहित्य कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्च अक्षरात लिहून ते दि. 15 सप्टेंबर 2022 पर्यंत मिळेल अशा बेताने सौ. मीनाक्षी अजित पाटील , आई निवास , खोपटे पाटीलपाडा पो. कोप्रोली ता. उरण जी. रायगड पि.को. 410206 या पत्त्यावर पाठवावे, असे आवाहन झुंजार युवा मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.