‘
ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत दांडेकर यांचे विचार
उरण दि 18 (विठ्ठल ममताबादे ) : उरण शहरातील विमला तलाव येथे दरमहा 17 तारखेला मधुबन कट्टा कविसंमेलन या नावाने सातत्याने कवी संमेलन होत असतो.हे 82 वे कविसंमेलन. या सर्व संमेलनांचा आम्ही उरणचे ज्येष्ठ नागरिक आनंद घेत असतो. त्यामुळे 17 तारीख आम्हासाठी आनंदाची असते, असे विचार ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत दांडेकर यांनी मांडले.
यावेळी रायगडभूषण प्रा एल बी , बाळाराम म्हात्रे, चंद्रकांत मुकादम, रवींद्र सूर्यवंशी,
दत्ता निलवर्ण,चंद्रकांत चव्हाण,नारायण भोईर ,अर्चना गायकवाड इत्यादिंची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन रंजना केणी यांनी सुरेख केले.प्रास्ताविक मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले.
स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी
आणि श्रावण गाणी या विषयावर रामचंद्र म्हात्रे, संजय होळकर,मारूती तांबे,भालचंद्र म्हात्रे,अनंत पाटील, सी बी म्हात्रे ,म.का. महात्रे,संजय केणी,अरूण म्हात्रे,संजीव पाटील,संग्राम तोगरे
भास्कर चाटे इत्यादींनी कवितांचे वाचन आणि गायन केले.यावेळी अरविंद घरत,रवींद्र सूर्यवंशी,शंकर राव या ज्येष्ठ नागरिकांना ” जीवन गौरव”पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.