https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कडवईत रिक्षा मालक -चालक संघटनेतर्फे विविध कार्यक्रम

0 75

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे महाराष्ट्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्यावतीने कडवई बाजारपेठ येथे सत्यनारायण महापूजेसह विविध कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या गुणवताच्या सत्कार समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून संघटनेला शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र दिनी कडवई बाजारपेठ येथे गेली १५ वर्षे रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्यावतीने विविध सांस्कृतिक , धार्मिक व शक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या काळात एक वर्ष यामध्ये खंड पडला होता .
या वर्षी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. सत्यनारायण महापूजेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी दुपारी १२ ते ३ यावेळात महाप्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर रिक्षा संघटना व विश्वकर्मा भजन मंडळ कडवई सुतारवाडी यांनी भजने सादर केली. तसेच स्वप्नील चिले यांचा बहारदार गीतांचा सप्तसुर माझे हा कार्यक्रम प्रेक्षकांची दाद मिळवून गेला.
संध्याकाळी साडेसहा वाजता कडवई पंचक्रोशीतील समूहिक हरिपाठ सादर करण्यात आला. यात चिखली, रांगव, तांबेडी , शिंदेंआंबेरी, शेंबवणे व कडवई येथील वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
रात्री साडेनऊ वाजता संघटनेच्या वतीने पंचक्रोशीतील गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. मौजम कपाडे, शशिकांत किंजलकर , स्वरा रेडीज , शेजल आदवडे, समीर बोले , उदय चव्हाण, युवराज गायकवाड , रामचंद्र राणे, धनश्री आदवडे, डॉ. भगवान नारकर, कमलेश पाटील या गुणवंतांना पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. नारकर यांच्यासह झावरे यांनी रिक्षा संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी बोलताना सामाजिक भान ठेऊन रिक्षा व्यवसाय केल्यास उन्नतीचा मार्ग सुकर होईल, असे
मत मांडले व संघटनेचे कौतुक करत भावी वाटचालीस सुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर सत्कार मूर्तीसह कडवईचे उपसरपंच दत्ताराम ओकटे , तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र बोथरे ,पोलीस पाटील रमेश तुळसनकर , राजवाडी उपसरपंच दिलीप गुरव आदी मान्यवर व रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष संदीप चिले व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी केले .
या कार्यक्रमास आमदार शेखर निकम, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, माजी बांधकाम सभापती राजन कापडी , जिल्हा बँक संचालक राजू सुर्वे, रमजान गोलंदाज, जमरुत अलजी यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

(फोटो – सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे)

Leave A Reply

Your email address will not be published.