उरण (विठ्ठल ममताबादे ): नंदा फाउंडेशन, इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन गोरेगाव मुंबई आयोजित स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी या काव्यसंग्रहासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून स्वरचित काव्य समर्पण स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. या काव्य संग्रहात एकूण 44 कवींची काव्य प्रकाशित करण्यात आले. त्यामध्ये भेंडखळ-उरण येथील किरण अनंत घरत (08) यांची कविता प्रकाशित करण्यात आली. त्याबद्दल त्यांना नंदा इनोव्हेटिव्ह काव्य सन्मान गौरवपूर्ण प्रदान करण्यात आले.
भेंडखळचे किरण घरत यांनी लिहिलेली कविता अत्यंत वाचनीय व विचार करायला लावणारी आहे. अगदी परखड शब्दात सैनिकांच्या व्यथा त्यांनी कवितेतून मांडले आहे.सुंदर कविता असल्यामुळे त्यांना सदर सन्मान प्राप्त झाला असून त्यांना सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी भावी साहित्य वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.