जीवनगौरव पुरस्काराचा अभिमान : रविंद्र सुर्यवंशी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरणच्या अनेक नागरिकांना जीवनगौरव पुरस्कार कधी मिळालेला नाही.परंतू प्रत्येक १७ तारखेला ३ ज्येष्ठांना उरण कोमसाप प्रमाणपत्रासह सत्कार करून गौरविण्यात येते. तो आम्हाला अभिमान वाटतो, असा विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र सुर्यवंशी यांनी १७ जुलै २०२२ रोजी तारखेला विमला तलाव येथे मांडले.
प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप ) व मधुबन कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने उरण शहरातील विमला तलाव (गार्डन)येथे कवी संमेलन भरविले जाते. त्याला सर्व कवी, साहित्यिक यांचा उत्तम प्रतिसादही मिळत असतो. असे सांगत अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी आपले आपले मत मांडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात यशवंत नथुराम, नारायण भोईर,चंद्रकांत गोखले यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.रायगड भूषण प्रा.एल.बी. सूर्यकांत दांडेकर,बाळाराम म्हात्रे,मारुती तांबे,रामदास शेलार यांनी मार्गदर्शन केले. कविसंमेलनात भगवान पोसू, चेतन पाटील, संजय होळकर, अरुण.द.म्हात्रे, भरत पाटील, मारुती तांबे, इ.कवींनी रंगतदार काव्यवाचन केले.सूत्रसंचालन भ.पो.म्हात्रे यांनी केले.