कामोठे येथे एकविरा कला संस्था व तेजस पाटील (दिग्दर्शक, गायक) यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
उरण दि. 20 (विठ्ठल ममताबादे ) : एकविरा कला संस्था (पनवेल रायगड) या संस्थेने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी नेहमी सातत्याने केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे यासाठी नेहमी आंदोलन उपोषणामध्ये एकविरा कला संस्था सहभागी झाली आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व दि. बा पाटील यांच्या विचारांची संस्कृती जपण्यासाठी एकविरा कला संस्था (पनवेल रायगड ) या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रविवार दि.7 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9:30 वाजता आगरी समाज मंगल कार्यालय, गणेश मंदिर शेजारी, कामोठे गाव, नवी मुंबई येथे ‘दिबा साहेबांना सांस्कृतिक आदरांजली’ या नावाने अभंग स्पर्धा, पखवाज वादन स्पर्धा, तबला वादन स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सादरीकरण कालावधी 1 ते 5 मिनिटाचा असून वय वर्षे 10 ते 18 व 18 ते खुलागट असे स्पर्धेचे गट आहेत. शिवाय विविध मान्यवरांचा दिबांचा योध्दा म्हणून विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
.मराठी इंडियन आयडल विजेता सागर म्हात्रे याचा विशेष नागरी सत्कार होणार आहे. तरी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अविनाश पाटील 9930010422, मिलिंद कडू – 8080934938 यांच्याशी संपर्क साधावे.असे आवाहन एकविरा कला संस्था ( पनवेल रायगड) चे संस्थापक तथा अध्यक्ष तेजस पाटील यांनी केले आहे