मृदुला महेंद्र ठाकूर यांच्या चित्र प्रदर्शनाला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद
दिग्दर्शक, निर्माते मदन पटेल यांची उपस्थिती
उरण (विठ्ठल ममताबादे ) : प्रसिध्द मूवी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते तथा कर्नाटका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मदन पटेल यांच्या उपस्थितीत उरण तालुक्यातील कोप्रोली गावच्या सुपुत्र तथा उत्कृष्ट महिला चित्रकार मृदुला महेंद्र ठाकूर यांच्या कलाकृतींचे कर्नाटका चित्रकला परिषद येथील प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन झाले.
या उद्घाटनाच्या वेळी व्हाइस प्रेसिडेंट अ. रामा कृष्णाप्पा कर्नाटका चित्रकला परिषद, जनरल सेक्रेटरी के. स. अप्पाजया, प्रो. रमा शर्मा आदी मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली. या उद्घाटनास अनेक रसिक प्रेक्षकांनी भेट देऊन त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. मान्यवरांनी चित्रांबद्दल कुतूहलाने प्रत्येक कलाकृती विषयी माहिती घेतली. आणि पुढील प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या.मृदुला ठाकूर या उरणचे काँग्रेसचे जेष्ठ नेते महेंद्र ठाकूर यांच्या कन्या आहेत. या आधीही मृदुला ठाकूर यांच्या अनेक चित्रकला प्रदर्शनांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.कर्नाटक मधील चित्र प्रदर्शनाला देखील जनतेचा, रसिक प्रेषकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मृदुला महेंद्र ठाकूर हिचे सर्वत्र कौतुक होत आहे