रत्नागिरीचं ग्रंथालय होणार डिजिटल !
शासकीय विभागीय ग्रंथालयांमध्ये उपलब्ध ग्रंथ, साहित्य पुस्तके मोबाईल ॲपद्वारे वाचता येणार
रत्नागिरी : आता पुस्तके वाचण्यासाठी प्रत्यक्ष ग्रंथालयात जाण्याची गरज नाही. आता मोबाईल, लॅपटॉप, बुक रीडरवरून ऑनलाईन कोणतंही पुस्तक केव्हाही कुठेही त्यांना वाचता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने काढलेल्या नव्या शासन आदेशानुसार आता शासकीय विभागीय रत्नागिरी येथील ग्रंथालय हे आधुनिक आणि डिजिटल रुपडं धारण करणार आहे.
या पाठोपाठ अनेक ठिकाणी शासकीय ग्रंथालय आधुनिक डिजिटल करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शासकीय विभागीय ग्रंथालयांमध्ये उपलब्ध ग्रंथ साहित्य पुस्तके हे मोबाईल ॲप मधून देखील वाचकांना वाचता येणार आहे. हे सर्व करण्यासाठी या शासन निर्णयानुसार शासनाने निधी देखील उपलब्ध करून दिला आहे.
ग्रंथालयात जाऊन आपण एक किंवा दोन पुस्तके घेऊन ती सोबत बाळगून वाचत होतो परंतु आता तसे न करता अनेक पुस्तके वाचकांना केव्हाही आणि कुठेही गरज असेल तेव्हा तसेच वेळ असेल तेव्हा आपल्या आता मोबाईलवर ऑनलाइन वाचता येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागने 25 मे 2022 रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार शासकीय विभागीय ग्रंथालय रत्नागिरी या कार्यालयाचे आधुनिकीकरण आणि डिजिटलायझेशन करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे
शासनाचे हे पाऊल निश्चितच वाचकांसाठी अतिशय महत्वाचं ठरणार आहे