रत्नागिरीत `जय भारता` देशभक्ति गीतांचे २३ जुलैला सादरीकरण
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त ‘केसरी उत्सव’ अंतर्गत उपक्रम
रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त “केसरी उत्सव” अंतर्गत “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” ही गर्जना करणारे आणि सगळयांचे लोकप्रिय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणुन ख्यातनाम आहेत. बाळ गंगाधर टिळक भारतीय क्रांतीकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकिल व भारतीय स्वातंत्र्य सेनानी देखील होते. बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै ला 1856 साली रत्नागिरीत झाला.
आजादी च्या अमृत महोत्सवा अंतर्गत विविध स्वतंत्रता सेनानी,वीरांना,व क्रांतिकारकांना त्यांच्या त्याग, योगदान व बलिदाना ला अभिवादन करण्यासाठी विभिन्न कार्यक्रमांच्या माध्यमातुन आदरांजली देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपुर व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,उदयपुर, संस्कृति मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानेदिनांक 23 जुलै 2022 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थानी लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, महिला मंडळ हॉल, डॉ. चितळे हॉस्पिटलनजीक, मारुती-गणपती पिंपळपार, टिळक आळी, रत्नागिरी येथे “केसरी उत्सव” अंतर्गत “जय भारता” या देश भक्तिपरगीतांच्याकार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
“केसरी उत्सव” अंतर्गत “जय भारता” या कार्यक्रमा मधे देशभक्ति गीतांची बहरदार प्रस्तुति रत्नागिरी च्या ‘स्वरलहरी वाद्यवृंद’ तर्फे श्री पांडुरंग बर्वे यांचे मार्गदर्शन व नेतृत्वात करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये गायक नरेंद्र रानडे, अभिजीत भट, गायिका अंजली लिमये, कश्मिरा सावंत देशभक्तीपर गीते सादर करणार आहेत. सिंथेसायझर-राजन किल्लेकर, हार्मोनियम-वरद सोहनी, ऑक्टोपॅड-शिवा पाटणकर, तबला-पांडुरंग बर्वे यांची वाद्यवृंद साथ लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन मीरा भावे करणार आहेत.
या अभिवादन कार्यक्रमात उपस्थिती राहून रसिकानी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजका कडून करण्यात येत आहे.