जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित उपक्रम
रत्नागिरी दि. १५ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतीक युवा कौशल्य दिन 15 जुलै,2022 चे औचित्य साधून जिल्हा कौशलय विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, शिरगांव, रत्नागिरी यांच्या संयुक्त विदयमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व
स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे दामले, आरती देसाई हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इनुजा शेख सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी यांनी केले. तसेच जिल्हा उदयोग केंद्राच्या महाव्यवस्थापक विदया कुळकर्णी यांनी स्वयंरोजगाराबाबत शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत (CMEGP) याबाबत विशेष असे मार्गदर्शन उपस्थित उमेदवारांना करुन व्यवसाय सुरु करण्याबाबत देखील आवाहन करण्यात आले.