रत्नागिरी दि.12:– जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी यांचे मार्फत 15 जुलै 2022 रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, शिरगांव रत्नागिरी येथे सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्याकरीता विविध खाजगी आस्थापनांकडून तीनशे हून अधिक रिक्त पदांची मागणी करण्यांत आली आहे. दहावी पास, नापास / बारावी/पदवीधर/ आयटीआय /
इंजिनिअर व इतर या शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. सदर मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर लॉगिन होऊन Job Fair टॅबमध्ये Job Fair Event > Select District > Action Participation > मधुन उमेदवाराला ज्या पदासाठी अर्ज करावयाचा असेलत्या उद्योजकाच्या समोर Apply या बटणवर क्लिक करावे तसेच 15 जुलै 2022 रोजी सदरच्या पंडीत दीन दयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याकरिता उपस्थित रहावे.
मुलाखतीसाठी उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता केंद्राकडील ओळखपत्र, आपल्या शैक्षणिक पात्रतेची मुळ प्रमाणपत्र, त्यांच्या छायाप्रती व पासपोर्ट साईज फोटो याच्यांसह स्वखर्चाने उपस्थित
रहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२१४७८/२९९३८५ सपंर्क साधावा, असे आवाहन ईनुजा शेख, सहायक आयुक्त यांनी केले आहे.