https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धुतूम शाळेत चित्रकला स्पर्धा

0 60

उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंती निमित्त रा.जि.प.प्राथमिक शाळा धुतूम येथे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना महिला आघाडी उरण तालुका उपसंघटिका व पालघर जिल्हानिहाय वक्ता मनिषा नितिन ठाकूर व शिवसेना सोशल मीडिया समन्वयक नितिन लक्ष्मण ठाकूर ह्यांनी शाळेय “चित्रकला स्पर्धा ” व मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी संतोष म्हात्रे ह्यांनी उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व नितिन लक्ष्मण ठाकूर व शालेय मुख्याध्यापक नरेश मोकाशी ह्यांनी श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचे गुण गौरव व आजच्या पिढीला कसे प्रेरणादायी आहेत हे आपल्या भाषणातून व्यक्त केले शिवाय धुतूम प्राथमिक शाळेतील विध्यार्थी कुमारी सान्वी शंकर घरत हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेरणादायी आणि उभारी देणारे असे भाषण केले.

प्राथमिक शाळा धुतूम मधील विद्यार्थ्यांनी खूप सुंदर व मनमोहक असे चित्र काढले होते. पहिले ते चौथी व पाचवी ते सातवी असे दोन गट बनवून प्रत्येकी प्रथम-द्वितीय-तृतीय असे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. सर्वांत प्रथम क्रमांक चा मानकरी कु.रचित रुपेश ठाकूर (इ.सातवी ) ह्याने त्याच्या चित्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरे, मा.उद्धवजी ठाकरे साहेब व मा.आदित्यजी ठाकरे साहेब यांचे चित्रकाढून सोबत शिवसेनेचे धनुष्य बाण देखील त्याने त्यात दाखवले हि त्या चित्राची खासियत होती.

या वेळी जासई शिवसेना विभागप्रमुख नारायण तांडेल, शेमटीखार अध्यक्ष विनोद ठाकूर, कावचीखार अध्यक्ष विक्रम ठाकूर , शेमटीखार उपाध्यक्षा रेश्मा ठाकूर, शालेय कमिटी अध्यक्ष करुणा घरत (माजी उपसरपंच शे.का.प.), शालेय कमिटी उपाध्यक्ष अभय ठाकूर, शालेय कमिटी सदस्य वैशाली पाटील (माजी उपसरपंच शे.का.प.) शेकाप कार्यकर्ता संजय घरत शिवसेना धुतूम पहिले व माजी शाखाप्रमुख लक्ष्मण ठाकूर , जेष्ठ शिवसैनिक लक्ष्मण पो.ठाकूर, जेष्ठ शिवसैनिक के.बी.पाटील, जेष्ठ शिवसैनिक सुरेश ठाकूर, संध्या सु.ठाकूर , निष्ठावंत शिवसैनिक रणजित ठाकूर, शुभांगी ठाकूर व तसेच रा.जि.प. प्राथमिक शाळा धुतूम शिक्षकवृंद मुख्याध्यापक श्री नरेश मोकाशी, सहाय्य्क शिक्षक संतोष म्हात्रे, सहाय्यक शिक्षिका स्मिता म्हात्रे, सहाय्यक शिक्षिका संपदा चव्हाण, ग्रामपंचायत शिक्षिका वंदना ठाकूर व ग्रामपंचायत शिक्षिका माधुरी पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.