Ultimate magazine theme for WordPress.

मध्य रेल्वेच्या १४ कर्मचाऱ्यांचा महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने गौरव

0 93

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करन यादव यांनी दि. १४.०५.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई विभागातील ५, भुसावळ विभागातील ५, नागपूर विभागातील २ आणि पुणे व सोलापूर विभागातील प्रत्येकी १-१ मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा संरक्षा पुरस्काराने सत्कार केला.

ड्युटी दरम्यान त्यांनी दाखवलेली सतर्कता, मागील महिन्यांत ट्रेन ऑपरेशन्समध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेले योगदान, अनुचित घटना टाळण्यात त्यांचे योगदान या बद्दल हे पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रूपये २०००/- रोख असतात.

मुंबई विभाग

१. श्री उज्ज्वल कुमार, ट्रॅकमन, पनवेल, दि. ०९/०४/२०२४ रोजी काम करत असताना, निलजे स्टेशनचे पॉइंट क्र. 103B च्या मागे रेल्वेला तडा गेलेला दिसला. त्यांनी तात्काळ बचाव कार्य करून 10 किमी वेगाची मर्यादा घालून पहिली ट्रेन पास करून सर्व संबंधितांना कळविले. त्यांच्या दक्षता आणि सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

२. श्री जे पी काटकर, MCM/इलेक्ट्रिकल, कुर्ला कार शेड, दि. ०६/०४/२०२४ रोजी काम करत असताना, कुर्ला प्लॅटफॉर्म क्र. 1 वर लोकल T/33 चे युनिट क्र. 5427 चे पँटो हॉर्न वाकलेले दिसले. त्यांनी संबंधित सर्वांना माहिती दिली. हे युनिट वेगळे करून ठाणे स्थानकावर साईडिंगवर नेण्यात आले. त्यांच्या या सतर्कतेमुळे पँटो अडकणे आणि ओएचई ब्रेकडाउन टळले.

३. श्री सुरेश यादव, SCM/मेकॅनिकल, मुलुंड साईडिंग, दि. १४/०४/२०२४ रोजी साईडिंगवर स्थिर रेक तपासत असताना त्यांना आढळले की एका वॅगनच्या बोगीला तडे गेले होते जे लगेच समजणे कठीण होते. परंतु त्यांना समजताच त्यांनी संबंधित सर्वांना माहिती दिली. ही वॅगन रेकपासून वेगळी करण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

४. श्री श्याम मनोहर साळी, SCM/मेकॅनिकल, लोणावळा, दि. ४/०४/२०२४ रोजी लोणावळा मालवाहतूक डेपो येथे मिलिटरी स्पेशल ट्रेनच्या देखभालीदरम्यान, एका वॅगनच्या एल स्प्रिंगचे शॅकल स्प्रिंग तुटलेले दिसले. त्यांनी संदेश देताच सांगितलेली वॅगन वेगळी झाली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

५. श्री पिंटो मीना, सहाय्यक स्टेशन मॅनेजर, इगतपुरी, दि. ०४/०४/२०२४ रोजी २३.१५ वाजता, TGR 1 केबिनमधील जुन्या रिले रूममध्ये चोरी करणाऱ्या तीन चोरांपैकी एकाला पकडून आरपीएफ च्या ताब्यात देण्यात आले. त्यांनी धैर्य दाखवून रेल्वेला संभाव्य नुकसानीपासून वाचवले.

भुसावळ विभाग

६. श्री नागेंद्र कुमार, असिस्टंट लोको पायलट, भुसावळ, दि. २२/०३/२०२४ रोजी, 11055 डाउन गोदान एक्स्प्रेसच्या कामादरम्यान, नाशिक स्थानकावरून सुरु होताच एसीपी मुळे गाडी थांबली. मागच्या एसएलआरमधून धूर निघताना दिसला. त्यांनी तत्काळ इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसएलआर रेकपासून वेगळा केला. त्यांच्या या जलद कारवाईमुळे आग इतर डब्यांमध्ये पसरली नाही.

७. श्री वसंता राहुल दोडे, ट्रॅकमन, माना, दि. २२/०३/२०२४ रोजी काम करत असताना, वाहन पॉईंट क्र. 115 A मधून जात असताना एक असामान्य आवाज ऐकू आला. तात्काळ फिश प्लेट उघडली आणि रेल्वेला तडा दिसला. त्यांनी सर्व संबंधितांना माहिती दिली आणि ट्रॅकचे संरक्षण केले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

८. श्री दीपक शंकर, ट्रॅकमन, मलकापूर, दि. २६/०३/२०२४ रोजी गस्तीदरम्यान किमी 491/0 येथे ट्रान्सव्हर्स वेल्डला तडा गेल्याचे आढळले असता सर्व संबंधितांना कळवून ट्रॅकचे संरक्षण केले. त्यांच्या या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

९. श्री ज्ञानेश्वर पांडुरंग, SCM/मेकॅनिकल, भुसावळ, दि. ०७/०४/२०२४ रोजी भुसावळ यार्ड येथे BTPN लोडचे आगमन झाल्यानंतर, एका वॅगनमध्ये सामग्री गळती आढळून आली ज्याची माहिती सर्व संबंधितांना देण्यात आली, परिणामी सदर वॅगन ट्रान्स-शिपमेंटसाठी वेगळे केले. सतर्कतेमुळे रेल्वेचे नुकसान होण्यापासून वाचले.

१०. श्री दिनेश यादव, सहाय्यक उपनिरीक्षक, नाशिक, दि. २२/०३/२०२४ रोजी, 11055 डाउन गोदान एक्सप्रेसच्या मागील SLR मधून धूर निघत होता. ही माहिती मिळताच सर्व संबंधितांना आणि अग्निशमन दलाला कळवून तातडीने घटनास्थळी पोहोचले. सोबतच अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी सक्रीय सहकार्य केले. त्यांच्या या कौतुकास्पद कामामुळे आग पसरण्यापासून रोखली.

नागपूर विभाग

११. श्री सुंदरजीत कुमार, गार्ड, नागपूर, दि. १४/०४/२०२४ रोजी RPLW साईडिंग येथे GDR तपासणी दरम्यान, मालगाडीच्या वॅगनच्या साइड बेअररमध्ये 40 मिमी अंतर आढळून आले. त्यांनी संबंधित सर्वांना माहिती दिली. सदर वॅगन सेवेपासून वेगळी करण्यात आली आणि ट्रेन रवाना करण्यात आली. त्यांच्या या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

१२. श्री राजेंद्र ईश्वर बोथले, ट्रॅकमन, वरोरा, दि. ११/०४/२०२४ रोजी उन्हाळ्यात गस्त घालत असताना, डाउन लाईनच्या 825/22-825 किलोमीटर दरम्यान रेल्वेला तडा गेलेला दिसला. ज्यामध्ये रेल्वेचा एक गोलाकार तुकडा बाहेर आला होता. तात्काळ कारवाई करून, सर्व संबंधितांना माहिती दिली आणि ट्रॅक वाचवला, त्यामुळे येणारी ट्रेन 01315 अपघातापासून वाचली.

पुणे विभाग

१३. श्री जगदीश मारुती, गंगमाते, भिलवडी, दि. २६/०३/२०२४ रोजी, कामाच्या दरम्यान, जाणाऱ्या असुरक्षित मालगाडीच्या ब्रेक व्हॅनमधून एक असामान्य आवाज ऐकू आला. तात्काळ स्टेशन मॅनेजर/भिलवडी यांना कळवले. किर्लोस्करवाडी स्थानकावर मालगाडी थांबवण्यात आली आणि ब्रेक व्हॅन सेवेतून बाहेर काढण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला.

सोलापूर विभाग

१४. श्री विलास भारत, ट्रॅकमन, मुरुड, दि. ०५/०४/२०२४ रोजी औसा रोड – ढोकी स्टेशन दरम्यान ट्रेन 01488 च्या स्लीपर कोचमध्ये (S1) हॉट एक्सल दिसले. लाल सिग्नल दाखवून गाडी पार्क केली आणि संबंधित सर्वांना कळवले. चर्चेनंतर ट्रेन सावधपणे ढोकी स्थानकाकडे पाठवण्यात आली, तिथे तो डबा वेगळा करून ट्रेन पुढे नेण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

महाव्यवस्थापकांनी आपल्या भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, अशा सतर्कता आणि शौर्याने इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.

श्री चित्तरंजन स्वैन, अप्पर महाव्यवस्थापक; श्री एम एस उप्पल, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी; श्री एस एस गुप्ता, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक; श्री राजेश अरोरा, प्रधान मुख्य अभियंता; श्री सुनील कुमार, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता; श्री एन. पी. सिंग, प्रधान मुख्य विद्युत अभियंता यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.