- सावंतवाडी दिवासह जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दि. ०९/०२/२०२४ (शुक्रवार) रोजी ०९:०० ते ११:३० या वेळेत आडवली – आचिर्णे विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी ०२:३० तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मेगा ब्लॉकमुळे रेल्वे सेवेवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन
गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेसचा प्रवास 09/02/2024 रोजी सुरू होणारा सावंतवाडी रोड – कणकवली विभागादरम्यान 90 मिनिटांसाठी रोखून ठेवला जाईल.
गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. 09/02/2024 रोजी सुरू होणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी स्थानकावर 10 मिनिटांसाठी रोखून ठेवला जाईल.