Ultimate magazine theme for WordPress.

विनातिकीट प्रवासी शोध मोहिमेतून रेल्वेच्या तिजोरीत तब्बल ३०० कोटी रुपयांचा महसूल!

0 259
    • विनातिकीट प्रवास कमी करण्यात/आळा घालण्यात मध्य रेल्वे सर्व विभागांमध्ये आघाडीवर
    • २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३०० कोटी रुपयांची कमाई नोंदवून ४६.२६ लाख प्रकरणे शोधण्यात आघाडीवर

    मुंबई : विनातिकीट प्रवासावर बंदी घालण्यात मध्य रेल्वे सर्व विभागामध्ये प्रथम क्रमांकाची रेल्वे म्हणून आघाडीवर आली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ (एप्रिल २०२३ ते मार्च-२०२४) दरम्यान, मध्य रेल्वेने विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाच्या ४६.२६ लाख प्रकरणांमधून ३०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला.

    मध्य रेल्वेने रु. २६५.९७ कोटी महसुलाच्या बाबतीत या वर्षीचे लक्ष्य १२.८०% ने ओलांडले आहे आणि एकूण ४२.६३ लाख प्रकरणांमध्ये ८.३८% लक्ष्य पार केले असून प्रकरण आणि कमाईच्या बाबतीत सर्व विभागामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

    प्रकरणांची संख्या आणि प्राप्त केलेले महसूल यांचा विभागनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे:

    • मुंबई विभागात २०.५६ लाख प्रकरणांमधून ११५.२९ कोटी रुपये प्राप्त केले.
      •भुसावळ विभागातील ८.३४ लाख प्रकरणांमधून ६६.३३ कोटी रुपये प्राप्त केले.
    • नागपूर विभागात ५.७० लाख प्रकरणांमधून ३४.५२ कोटी रुपये प्राप्त केले.
    • सोलापूर विभागातील ५.४४ लाख प्रकरणांमधून ३४.७४ कोटी रुपये प्राप्त केले.
    • पुणे विभाग ३.७४ लाख प्रकरणांमधून २८.१५ कोटी रुपये प्राप्त केले.
    • मुख्यालय २.४७ लाख प्रकरणांमधून २०.९६ कोटी रुपये.

    मध्य रेल्वेकडे दोन महिला वरिष्ठ तिकीट परीक्षकाचा समावेश असून २२ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांनी तिकीट तपासणीच्या उत्पन्नात वैयक्तिकरित्या १ कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले आहे. त्यापैकी मुख्य तीन आहेत –

    • श्री सुनील नैनानी, ट्रॅव्हल तिकीट निरीक्षक/मुंबई, २०,११७ प्रकरणांमधून १.९२ कोटी रुपये मिळवले.
    • श्री एम.एम. शिंदे, मुख्य तिकीट निरीक्षक/मुंबई, १८,२२३ प्र प्रकरणांमधून १.५९ कोटी रुपये मिळवले.
    • श्री धर्मेंद्र कुमार, प्रवास तिकीट निरीक्षक/मुंबई, १७,६४१ प्रकरणांमधून १.५२ कोटी रुपये मिळवले.
    • श्रीमती रुपाली माळवे, महिला वरिष्ठ तिकीट परीक्षक, पुणे यांनी १५,०१५ प्रकरणांमधून १.३१ कोटी रुपये मिळवले.
    • श्रीमती मनीषा छकने , महिला मुख्य टिकट परीक्षक, पुणे ने यांनी १३,००४ प्रकरणांमधून १.२१ कोटी रुपये मिळवले.

    सर्व रेल्वे वापरकर्त्यांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करते. विनातिकीट प्रवास आणि अशा इतर गैरप्रकारांमुळे होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत.

    प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सुलभ प्रवास करण्यासाठी प्रवाशांना वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे करीत आहे.

    Leave A Reply

    Your email address will not be published.