दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते चिपळूण दरम्यान दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेकडून हा ब्लॉक घेतला जाणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 27 रोजी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांपासून सायंकाळी 3 वा. 10 मिनिटांपर्यंत असा अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
या ब्लॉकमुळे कोईमतून ते जबलपूर दरम्यान धावणारी व 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रवास सुरु होणारी विशेष गाडी 02197 ही रत्नागिरी ते कामथे स्थानकादरम्यान 1 तास थांबवून ठेवली जाणार आहे. याचबरोबर सावंतवाडी ते दिवा दरम्यान धावणारी 27 फेब्रुवारी 2024 रोजीची गाडी (10106) 1 तास 10 मिनिटे सावंतवाडी ते रत्नागिरी दरम्यान रोखून ठेवली जाणार आहे.