‘ओएनजीसी’च्या उरण प्लांटमार्फत मुलांसाठी ‘अलबत्या-गलबत्या’चा प्रयोग
मुले शिक्षकांसह पालकांनाही भावले नाटक!
उरण दि २७(विठ्ठल ममताबादे ) : ओएनजीसी उरण प्लांटने जेएनपीटी आणि एनजीओ सिटिझन्स असोसिएशन फॉर चाइल्ड राईट्स यांच्या संयुक्त विद्यमाने उरणच्या जवळपासच्या गावातील मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ हा प्रसिद्ध मराठी नाटकाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सुभोजित बोस ईडी-प्लांट मॅनेजर उरण, अशोक बाबू, सीजीएम- सपोर्ट मॅनेजर, श्रीमती भावना आठवले, जीएम-इन्चार्ज एचआर-ईआर, स्थानिक संस्था, शाळांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ओएनजीसी गेटपासून जेएनपीटी सभागृहाकडे जाणाऱ्या बसेसना हिरवा झेंडा दाखवला.
या उपक्रमाचे ग्रामस्थ, मुले, शिक्षक व पालकांनी भरभरून कौतुक केले. नाटकातील कलाकारांचेही शेवटी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आणि सर्वांनी उत्साहाने शाळकरी मुलांसोबत फोटोशूटमध्ये सहभाग घेतला.
ओएनजीसी बऱ्याच काळापासून शालेय मुलांसाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करत आहे जे स्थानिक समुदायाशी भावनिक बंध मजबूत करण्यास मदत करतात.