जासई विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त वारी आणि वृक्षदिंडी उत्साहात संपन्न
उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, दहागाव विभागा जासई, ता.उरण. जि. रायगड या विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वारी, आणि वृक्षदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री ,कामगार नेते सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन केले गेले. त्यांच्या समवेत विद्यालयाचे व्हाइस चेअरमन डी.आर. ठाकूर ,यशवंत घरत ,अमृत ठाकूर, रघुनाथ ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग त्याचबरोबर महाराष्ट्र रयत सेवक संघाचे समन्वयक नुरा शेख यांनी पालखीला खांदा देऊन पालखीचे प्रयाण जासई गावात केल. विद्यालयातील सर्व विद्यार्थी पालखी समवेत ढोल ताशाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषाने पालखी फिरली. या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी वारकरी वेषात विठ्ठल रुक्माई पोशाख करून डोक्यावर तुळशी वृंदावन व विविध प्रकारच्या वृक्ष कुंड्या घेतल्या होत्या.गावातील सुवासिनिंनी वारीतील पालखीचे पूजन करून आशीर्वाद घेतले.