मुंबई, 18 मार्च 2024 : भारतीय जनता पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग विकास आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा प्रदेश भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे संयोजक जयसिंग चव्हाण यांनी सोमवारी केली. प्रदेश सहसंयोजकपदी हर्षल साने, डॉ. खुशी मोहमद अंसारी तसेच विशेष निमंत्रित म्हणून राजेंद्र पुरोहित व निमंत्रित म्हणून संजय चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिव्यांगांच्या २१ विविध प्रवर्गांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन विभागवार प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. दिव्यांगांच्या विकासासाठी कार्य करणा-या व्यक्तिंचा समावेशही कार्यकारिणीत करण्यात आला आहे, असे प्रदेश संयोजक श्री. चव्हाण यांनी पत्रकात म्हंटले आहे.
संपूर्ण कार्यकारिणी सोबत जोडत आहोत.