रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन राजधानी एक्सप्रेस गाड्यांना प्रथम श्रेणी वातानुकूलित तसेच तृतीय श्रेणी असे दोन डबे कायमस्वरूपी वाढवण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वे मार्ग धावणारी हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम त्री साप्ताहिक राजधानी एक्सप्रेस(12432/12431) तसेच हजरत निजामुद्दीन ते मडगाव डी साप्ताहिक राजधानी एक्सप्रेस (22414/22413) या दोन्ही गाड्या सध्या एकूण वीस डब्यांसह धावतात. या दोन्हीही राजधानी एक्सप्रेस गाड्यांना प्रत्येकी एक प्रथम श्रेणी एसी व एक तृतीय श्रेणी एसी असे दोन डबे वाढवण्यात येणार आहेत. या बदलामुळे या गाड्या आता 22 एल.एच बी. डब्यांसह धावणार आहेत.
हजरत निजामुद्दीन ते तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेसला हा बदल दि. 4 फेब्रुवारी 2025 पासून तर तिरुअनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन या फेरीसाठी 6 फेब्रुवारीपासून वाढीव डबे जोडले जातील.
त्याचबरोबर हजरत निजामुद्दीन ते मडगाव राजधानी एक्सप्रेसला निजामुद्दीनयेथून दिनांक 7 फेब्रुवारीपासून तर मडगाव ते हजरत निजामुद्दीन या मार्गावर धावताना 9 फेब्रुवारी 2025 पासून वाढीव डब्यांची अंमलबजावणी होईल.
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |