घोडीवली, शिरगाव येथे कातकरी बांधवांना जातीचे दाखले देण्यासाठी शिबिर
उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) : कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आणि अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे आणि तहसीलदार खालापूर आयुब तांबोळी यांच्या सहकार्याने तसेच उरण सामाजिक संस्था व टाटा स्टील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ०२ जानेवारी २०२३ रोजी खालापूर तालुक्यातील घोटीवली कातकरीवाडीमधील कातकरी लोकांचे जातीचे दाखले काढण्यासाठी फॉर्म्स भरून घेतले.
या कॅम्पमध्ये २५७ लोकांचे फॉर्म्स भरून घेतले. रायगड भूषण दत्ता गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, मनीष कातकरी, रत्नाकर घरत, टाटा स्टील फाउंडेशन तर्फे उदय गावंड, संदेश पानसरे मंडळ अधिकारी खालापूर, प्रतिक बापर्डेकर तलाठी नावंढे, स्थानिक पातळीवर जानू वाघमारे, आदिवासी विकास निरीक्षक दळवी यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.