https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून उरणमध्ये स्वच्छता अभियान

0 325

उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे )सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपीता रमीतजी असीम यांच्या मार्गदर्शनानुसार संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून उरण सिटी ब्रँच मधे प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन हे उपक्रम रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी उरण तालुक्यातील विनायक केगांव गणपती मंदिर तळा या ठिकाणी संपन्न झाले.

या ठिकाणी उरण सिटी ब्रँचचे १२५ पेक्षा अधिक सेवादल आणि संत महात्मा उपस्थित होते. आणि त्यांनी तळ्याच्या व मंदिराच्या परिसराची सफाई केली. सकाळी ७ वाजता सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या चरणी सर्व उपस्थित संत महात्मा यांनी प्रार्थना करुन स्वच्छ जल स्वच्छ मन या कार्यक्रमाची सुरवात केली.मिशनचे प्रचारक महात्मा सहदेव पाटील यांनी स्वच्छ जल सोबतच आंतरीक मनाच्या स्वच्छतेचे महत्त्व केवळ ब्रह्मज्ञान घेवूनच प्राप्त करता येईल असे सांगितले . तसेच उरण सिटी ब्रँचचे प्रमुख समीर पाटील यांनी युगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचा उल्लेख करत त्यांनी दिलेल्या शिकवणींचे स्मरण केले.

या कार्यक्रमासाठी केगांव ग्रामपंचायत सरपंच जगजीवन नाईक उपस्थित होते.व ग्रामपंचायत समितीचे सदस्य आशिष तांबोळी हे सुद्धा उपस्थित होते.उरण मध्ये मोठया प्रमाणात साफसफाई झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.