देवरूख पोलिसांना पालखी वाद मिटविण्यात यश
तीन ठिकाणी पालखीचा वाद मिटला
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिमगोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून कोणताही अनुचित प्रकार न होता शांततेत सर्वत्र पालखी आता घरोघरी फिरू लागल्या आहेत.
साखरपा बीटमधील ओझरे बुद्रुक. पुर्ये सह अन्य ठिकाणाचे वाद मिटविण्यात देवरूख पोलिसांना यश मिळाले असून पालखी आता घरोघरी जात असल्याने ग्रामस्थानी आनंद व्यक्त केला आहे. देवरूख पोसीस स्टेशनच्या हद्दीतील तीन ठीकाणी अनेक वर्षाचा वाद होता. ते वाद मिटविण्यासाठी देवरुख पोलीस निरीक्षक पाटील यांनी सर्वांच्या मदतीने मिटविण्यासाठी प्रयत्न केले. वादामुळे शिमगा उत्सवात पालखी वाडी वस्ती मध्ये जात नव्हती.
याबाबत देवरूख पोलीस ठाण्याचे नुतन पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक , महसूल कर्मचारी व मानकरी आदींनी सहभाग घेवून गावातील वाद यशस्वीपणे मिटवण्यात पोलीसांना यश आले आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वाद होवू नयेत यासाठी प्रयत्न केले गेले. त्यामुळे सर्वत्र पालखी घरोघरी जात असल्याने वाद मिटल्याने त्या गावातील गावकरी यांनी आनंद व्यक्त करीत आहेत.
देवरूख पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात सर्वत्र शिमगोत्सव शांततेत पार पडत आहे.