गुजरातमधील निशीइंडो फूड्सच्या संचालकांची रत्नागिरीतील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला भेट
रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयास निशीइंडो फूड्स चे संचालक श्री. दीपक चौधरी तसेच श्री. अजित गायकवाड, (Insolvancy Professional), मत्स्य महाविद्यालय, पेठकिल्ला, रत्नागिरी च्या प्रथम बॅचचे (१९८१-१९८४ बॅच) माजी विद्यार्थी यांनी नुकतीच भेट दिली. भेटी दरम्यान श्री. दीपक चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मत्स्य संवर्धन आणि मत्स्य तंत्रज्ञान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. मत्स्य व्यवसायाशी निगडित येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय योजना याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
तसेच श्री. अजित गायकवाड यांनी मत्स्य क्षेत्रातील आर्थिक व्यवस्थापन आणि विमा संरक्षण याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी बाबत विषद केले.
या भेटी दरम्यान मत्स्य अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते, सहाय्यक प्राध्यापक डॉ.राकेश जाधव, श्री. तौसिफ काझी, श्री. निलेश मिरजकर, श्री. रोहित बुरटे, श्री. सुशील कांबळे आणि इतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.