जि. प. शाळा शिरवलीची कु. स्वाती गोबरे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम
लांजा : जि.प.पू.प्रा.शाळा शिरवली, ता.लांजाची विद्यार्थीनी कु.स्वाती सुनिल गोबरे (इ.७वी) हिने जिल्हा परिषद रत्नागिरीच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आयोजित जलजीवन मिशन कार्यक्रम माहिती व शिक्षण संवाद अंतर्गत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक पटकावत रु.२१,०००/- च्या भव्य बक्षिसाची मानकरी होण्याचा सन्मान प्राप्त केला.
जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ आज जिल्हा परिषद रत्नागिरीच्या कै.शामरावजी पेजे सभागृहात संपन्न झाला. या समारंभाला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.किर्तीकिरण पुजार साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.परिक्षित यादव , कृषी अधिकारी मा.श्री.अजय शेंडे , लेखाधिकारी मा.श्रीम. कौशल्या लिगाडे ,विस्तार अधिकारी मा.श्रीम.मंजूषा पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
आकर्षक प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व रोप देऊन मा.श्री.पुजार साहेब यांच्या शुभहस्ते कु.स्वाती गोबरे हिला गौरविण्यात आले तर बक्षिसाची रक्कम रु.२१ हजार थेट तीच्या बॅंक पासबुक खाती जमा केली जाणार आहे. ‘जलसंवर्धन काळाची गरज’ या विषयावर स्वातीने निबंध लिहिला होता. मार्गदर्शन उमेश केसरकर यांचे मार्गदर्शन लाभले